अभय राणे मित्रमंडळ आयोजित केपीएल कबड्डी स्पर्धा ठरली यादगार;भालचंद्र स्पोर्ट कणकवलीला उपविजेतेपद_
*💫कणकवली दि.०१-:* अभय राणे मित्र मंडळ टेंबवाडी कणकवली आयोजित पहिल्यावहिल्या ए.आर.एम.चषक कणकवली प्रिमियर लिग २०२१ कबड्डी स्पर्धेचा बिडीएम परबवाडी संघ अंतिम विजेता ठरला. भालचंद्र स्पोर्ट्स कणकवली संघाला फायनलमध्ये मात देत बिडीएम संघाने एआरएम चषकावर आपले नाव कोरत आकर्षक चषकासह रोख रु.२० हजारांचे बक्षीस पटकावले कोरोना साथरोगानंतर कबड्डी फेडरेशन च्या मान्यतेने अवघ्या महाराष्ट्रातील खुल्या मैदानातील पहिली कबड्डी स्पर्धा अभय राणे मित्रमंडळाने प्रकाशझोतात आयोजित केली होती. प्रो कबड्डीच्या धर्तीवर ३० आणि ३१ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेला कबड्डी रसिकांचा आणि खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपविजेता ठरलेल्या भालचंद्र स्पोर्ट,कणकवली संघाला रोख रु. १५ हजार रु.व चषक , तृतीय विजेता रुपेश स्पोर्ट ,चतृर्थ मानकरी ठरलेल्या अक्षय स्पोर्ट यांना रोख रक्कम व चषक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अभय राणे मित्र मंडळ आयोजित ए.आर.एम.चषक कणकवली प्रिमियर लिग २०२१ कबड्डीचा थरार टेंबवाडी येथील मैदानात कबड्डी रसिकांना पाहता आला. या पारितोषिक वितरण समारंभावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक तथा माजी नगरसेवक अभय राणे,सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत,जेष्ठ नागरिक संतोष राणे,सुनील सावंत,मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे,उपाध्यक्ष सर्वेश राणे,अमित मांडवकर,पंकज बागवे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत कणकवली शहरातील एकूण ७ संघमालकानी आपले संघ उतरवले होते.शनिवारी पहिल्या दिवशी १० सामने खेळवण्यात आले.या साखळी सामन्यात संघानी रोमहर्षक खेळ केला.तर रविवारी अंतिम दिवशी १६ सामने खेळवण्यात आले. सेमी फायनल सामान्यात रुपेश स्पोर्ट,अक्षय स्पोर्ट, बिडीएम स्पोर्ट व भालचंद्र स्पोर्ट यांनी आगेकूच केली.या संघापैकी बिडीएम स्पोर्ट व भालचंद्र स्पोर्ट यांनी चांगली खेळी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.पहाटेच्या गुलाबी थंडीत अंतिम सामना रंगला. यामध्ये बिडीएम स्पोर्टने नाणेफेक जिंकत मैदान स्वीकारत चढाई साठी भालचंद्र स्पोर्टला आमंत्रण दिले. दरम्यान मध्यतरीच्या वेळे अंती बिडीएम स्पोर्टसकडून प्रणय राणे यांनी उत्कृष्ट चढाई करत सामन्यात आपले वजन सिद्ध केले. या संघाकडे अधिक गुण असल्याने सामना एकतर्फी होतो असे वाटले.मात्र भालचंद्र स्पोर्टकडून प्रथमेश पेडणेकरने प्रत्येक चढाईत बोनस गुण आणत गुण फलक हलता ठेवला.मात्र सामना संपायला केवळ शेवटचे मिनिट शिल्लक असताना बिडीएम परबवाडी संघाने १ गुण मिळवत चषकावर आपले नाव कोरले. दोन्ही संघाकडून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत खऱ्या अर्थाने क्रीडारसिकांची मने जिंकली. पहाटे पर्यंत चाललेल्या स्पर्धेस मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.वैयक्तिक बक्षिसांची खैरात उपस्थितांकडून करण्यात आली. या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून बिडीएम संघातील प्रणय राणे याची निवड करण्यात आली. उत्कृष्ट पकड बिडीएम चा सूरज परब तर उत्कृष्ट चढाई म्हणून भालचंद्र स्पोर्टसच्या प्रथमेश पेडणेकर यांची निवड करत त्यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या सामन्यासाठी पंच म्हणून रामप्रसाद राणे,वशिम शेख,राजू बंगे,अजय राऊळ,दीपक चव्हाण,वेदांत हरमलकर यांनी काम पाहिले.समालोचन बाळू वालावलकर तर स्पर्धा यशस्वीतेसाठी ललित राणे,सागर राणे,संदेश आर्डेकर,बंडू राणे,रुपेश साळुंखे,शिवशंकर पारगावकर,समीर सावंत,विशाल जाधव,हरकेश पाल,शिवलिंग पाटील,बाबू बागवे,रोहन चव्हाण,शुभम कलिंगण,यश पालव यांनी विशेष मेहनत घेतली.
