कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला सुरूवात

⚡कणकवली ता.०८-: कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण आणखी वाढू नये यासाठी कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाला सुरुवात करण्यात आली असून कणकवली शहरात ही मोहीम सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली

कणकवली नगरपंचायत हद्दीतील कुत्र्यांना पकडणे व त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रीया करणे, औषधोपचार करून त्यांना मूळ अधिवासात सोडणे या कामाकरीता कणकवली नगरपंचायतीने व्हेट्स फॉर ॲनिमल्स, सातारा या संस्थेची निवड केली आहे.त्यामुळे कणकवलीत भटके कुत्रे निर्बीजीकरण करण्यासाठी नागरिकांनी संपर्क साधावा ,असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

कणकवली नगरपंचायतीने कुत्रे निर्बीजीकरण कामावर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्याकरीता समिती तयार केली असून श्रीम. निधी सावंत,श्रीम. सुप्रिया दळवी,डॉ. सुहास पावसकर,अनुप मोडक यांची यांचा यामध्ये समावेश आहे.त्यानुसार प्राणीक्लेश प्रतिबंध कायदा 1960 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 प्राणी उत्पत्ती प्रतिबंध नियम, 2001 चे काटेकोरपणे पालन संबंधीत कंत्राटदार यांनी करणे आवश्यक असल्याने याकामी कंत्राटदार व्हेंट्स फॉर ॲनिमल्स, सातारा यांचे कामावर पर्यवेक्षण, नियंत्रण करणे व वरील नमूद कायदे / नियम / सुचनांचे काटेकोर पालन होते किंवा कसे याबाबत खातरजमा करणेसाठी शहरातील या क्षेत्रातील तज्ञ / अनुभवी डॉक्टर / सेवाभावी व्यक्ती / प्राणीमित्र / नागरीक याबाबत लक्ष असणार आहे,असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे समीर नलावडे यांनी कळविले आहे .

You cannot copy content of this page