कणकवलीत 19 ऑक्टोबरला होणार दीपावली बाजाराचा शुभारंभ

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची संकल्पना; महिला बचत गटांना संधी

⚡कणकवली ता.०८-: कणकवली शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाला व वैयक्तिक स्वरूपात केलेल्या मालाला व्यासपीठ देण्यासाठी समीर नलावडे मित्रमंडळ व भाजप नगरसेवक यांच्यावतीने गतवर्षीप्रमाणे दीपावली बाजार या वर्षीही भरविला जाणार आहे. दीपावली बाजाराचे १९ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता आ.नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समारोप होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,अजय गांगण,राजू गवाणकर आदी उपस्थित होते.
गेल्यावर्षी दीपावली बाजाराच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल पाहता पुन्हा त्या महिला बचतगटांना व कुंभार समाजातील व्यावसायिकांना व्यासपीठ देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.हा दीपावली बाजार १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत राहील.

कणकवली येथील पेट्रोल पंपासमोर रिक्षा चालक मालक संघटनेच्या गणपतीच्या ठिकाणी दीपावली बाजार भरवण्यात येईल.त्या ठिकाणी ३५ स्टॉल उभारण्यात येणार आहेत.तिथे टेबल,लाईट,मंडप व्यवस्था करण्यात येणार आहे.याबाबत कोणतेही भाडे आकारले जाणार नाही. या स्टॉलवर प्लास्टिकचे कंदील विकण्यास बंदी असेल असे समीर नलावडे यांनी सांगितले

दिवाळी फराळामध्ये चकल्या, लाडू ,अनारसे,चिवडा,करंज्या,
शंकरपाळ्या,पोहे सर्व प्रकारचे पदार्थ घरगुती असणार आहेत.बांबू पासून बनवलेले कंदील विकण्यासाठी असतील.कुंभार लोकांना स्थान देणार आहोत.मातीच्या पणत्या,मातीचे कंदील,आकर्षक दिवे, मातीचे वॉल फीस ठेवण्यात येणार आहेत.महिलांना आवश्यक लागणारे साहित्य या ठिकाणी असणार आहे. तसेच चहा, सरबत स्टॉल असणार आहे. कणकवली शहरातील बचत गटांच्या मालाला व वैयक्तिक स्वरूपात केलेल्या मालाला व्यासपीठ देण्यासाठी हा आम्ही प्रयत्न करत असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page