ठाकरे गटाच्या रुपेश राऊळ यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.०६-: शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर अहोरात्र काम करत असल्याने कधी व्यासपीठावर तर कधी विधिमंडळ सभागृहात झोपा काढतात. काल तर दसरा मेळाव्यात ते स्टेजवर झोपा काढत होते. ते अहोरात्र काम करत असल्याने तसे होत असेल असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर झोपा काढतात,ते अहोरात्र काम करत असल्याने तसे होत असेल. या झोपा काढण्याच्या प्रकारामुळे जनतेला प्रश्न पडला आहे. मात्र ते स्टेजवर झोपा काढत असतात,तर अर्धवट कार्यक्रम सोडून जाण्याची घाई असते. विमान चुकते, मिटिंगला जायचं आहे, असे कायमच घाईत असतात त्यामुळे मतदारांशी बोलण्यास वेळ नसतो,असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.
ते म्हणाले, दीपक केसरकर यांच्या झोपा, विमान चुकते, मिटिंग आहे,अशा प्रकारे कारणं देत मुंबई मध्ये राहत आहेत. नागरिकांना त्यांचा गोड गोड शब्दांचा भुलभवैय्या वाटू लागला आहे असा टोला राऊळ यांनी हाणला.
दीपक केसरकर यांच्या झोपा मुळे मात्र मतदारसंघातले वर्षानुवर्ष प्रश्न मात्र गाढ झोपेतल्या स्वप्नातच राहणार नाहीत ना? तीन वेळा आश्वासने देऊन आमदार होण्यासाठी मत मागणाऱ्या व आमदार झाल्यानंतर मंत्री पदासाठी पक्षाशी गद्दारी करत पक्ष बदलणाऱ्या दीपक केसरकर यांच्यामुळे गेली तेरा वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सुटणारच नाही नाहीत असं ह्यांच्या झोपण्यातून जनतेने समजून जायचं का?
