सत्ताधारी आतातरी बोध घेणार का ..?;गटनेते शरद ठुकरुल
⚡देवगड ता.०६-: देवगड जामसंडेच्या जनतेची स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता गांभिर्याने काम करणे गरजेचे आहे.यातून सत्ताधारी आतातरी बोध घेणार का ? स्वच्छ सर्वेक्षण २०२२ देवगड जामसंडे नगरपेचायतीची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली असल्याचा आरोप गटनेते शरद ठुकरूल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,स्वच्छ सर्वेक्षण २०२२ देवगड जामसंडे नगरपेचायतीची अत्यंत दयनीय अशी
अवस्था झालेली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देवगड जामसंडे नगरपंचायत झोन
रॅकिंग मध्ये २९५ पैकी २१८ वा नंबर आला असून स्ट्रेट रॅकिंग ला ९० पैकी ८५ वा
नंबर आलेला आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीची स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले
आहेत. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
मागील पाच वर्ष देवगड जामसंडे नगरपंचायत स्वच्छतेच्या बाबतीत सातत्याने
अग्रेसर राहीलेली असून नवीन नगरपंचायत असतानाही झोन रॅकिंग व स्ट्रेट रॅकिंग ला
अव्वल नंबर मिळवलेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर नगरपंचायत विभागात नेहमी
अग्रेसर राहीलेली आहेत, असे असतानाही मागील सत्ताधारी व प्रशासनाने मागील पाच
वर्षात देवगड जामसंडे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी जे सातत्याने प्रयत्न केलेले
होते त्यामध्ये आताचे सत्ताधारी व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चा आलेला निकाल हा सत्ताधारींच्या डोळयात अंजन
घालणारा आहे. या निकालावरून देवगड जामसंडेच्या जनतेची स्वच्छतेच्या बाबतीत
कोणतीही तडजोड न करता गांभिर्याने काम करणे गरजेचे आहे.
यातून सत्ताधारी आतातरी बोध घेणार का ? याप्रसंगी विरोधी पक्ष गटनेते शरद ठुकरूल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
