मनसेची आगार प्रमुखांकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी मळेवाड गुळदुवे आरोंदा ते भटपवणी ही दुपारी २ ची बंद असलेली एसटी पुन्हा सुरू करण्याबाबत आज मनसे पदाधिकारी यांनी घेतली सावंतवाडी आगारप्रमुखांची भेट.दरम्यान मळेवाड गुळदुवे ते आरोंदा भटपावणी मार्गे जाणारी एसटी बस ही करोना काळानंतर बंद करण्यात आली होती सदर एसटी तात्काळ सुरू करण्यात यावी. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी निवेदन द्वारे आगारप्रमुख प्रमुखांकडे केली.
सद्यस्थितीत कॉलेज सुरू झाल्याने दुपारी दोनच्या सुमारास सुटणारी आरोंदा भटपावणी एसटी अजूनही सावंतवाडी आगाराकडून सुरू केली गेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच भटपावणी पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांचेही हाल होत आहेत तरी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या असून सावंतवाडी ते भटपावनी एसटी तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने आगार प्रमुख श्री बोधे यांची भेट घेत मनसेचे पदाधिकारी राजेश मामलेकर यांनी निवेदन सादर केले तसेच आगारप्रमुख श्री बोधे यांनी येत्या सोमवारपासून सदर एसटी सुरू करण्यात येईल असे आश्वासन मनसे पदाधिकाऱ्यांना दिले
यावेळी शहराध्यक्ष शहराध्यक्ष आशिष सुभेदार संतोष भैरवकर उपशहर अध्यक्ष शुभम सावंत सचिव कौस्तुभ नाईक आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक सुयोय शेटकर सुशांत जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
