सत्यनारायण कळंगुटकर सर्वोत्कृष्ट गायक;रोणापालमध्ये जिल्हास्तरीय भजन स्पर्धा संपन्न
⚡बांदा ता.०४-: रोणापाल येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा तांबुळी भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. दत्तगुरु भजन मंडळ वैभववाडी द्वितीय तर रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
रोणापाल येथील श्री देवी माऊली उत्सव मंडळाच्या वतीने माऊली मंदिर सभागृहात निमंत्रितांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन पं. स. माजी सभापती सौ. मानसी धुरी व मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी माजी उपसभापती संदिप नेमळेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे, सरपंच सुरेश गावडे, बाबल तुयेकर, सावंत सर, सुदीन गावडे, तानाजी गावडे, यशवंत कुबल, उदय देऊलकर, दादा गावडे, पार्देश परब, शंकर गावडे, परीक्षक दिगंबर गाड, योगेश प्रभू, अमेय गावडे आदी उपस्थित होते.
दोन दिवस झालेल्या भजन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबुळी, द्वितीय दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी, तृतीय श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, उत्तेजनार्थ श्री देवी माऊली भजन मंडळ साटेली. वैयक्तिक पारितोषिके – उत्कृष्ट हार्मोनियम वादक
अजिंक्य कलंगुटकर (पाडलोस), पखवाज
तुषार नागडे (अांदूर्ले),तबला साईप्रसाद नाईक (पिंगुळी), कोरस दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी, गायक सत्यनारायण कलंगुटकर (साटेली), झांज रोशन गवस (पाडलोस), श्रोता बाप्पा निगुडकर (निगुडे).
सर्व विजेत्या स्पर्धकांना अध्यक्ष प्रकाश गावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, पुष्पगुच्छ व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दिगंबर गाड (गोवा), योगेश प्रभू (कुडाळ) व अमेय गावडे (पाडलोस) यांनी केले. यावेळी तुषार देऊलकर, मंदार गावडे, प्रदिप नाईक, सागर गोठस्कर, नंदू नेमण आदींसह रोणापाल ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. स्पर्धेचे सुत्रसंचलन राजा सामंत यांनी तर आभार सुरेश गावडे यांनी मानले. दशक्रोशीतील शेकडो भजनप्रेमींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
