शॉक लागून मृत्यू झालेल्या तावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या अन्यथा उपोषण

नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिले निवेदन

⚡कणकवली ता.०३-: कणकवली बसस्थानकासमोर २९ ऑगस्ट २०२२ रोजी एका इसमाचा मृतदेह सापडला होता. मात्र त्या मृतदेहाची दोन दिवस ओळख पटली नव्हती. दोन दिवसांनंतर तो मृतदेह कणकवली येथील बाळकृष्ण शांताराम तावडे यांचा तो मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी देखील याबाबत वेळोवेळी दखल घेतली होती. तावडे यांचा मृत्यू हायवे लगत असलेल्या लाईट च्या पोलला स्पर्श होऊन शॉक लागून झाल्याचे पोस्टमार्टेम मध्ये उघड झाले. याबाबत आज ३ ऑक्टोबर रोजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी यांना निवेदन दिले.

You cannot copy content of this page