“त्या” दोन्ही रुग्ण वाहिकांचे ९ रोजी सुरेश प्रभू करणार लोकार्पण

वेंगुर्ले, प्रतिनिधी.

एजीस फेडरल लाईफ इन्शुरन्स यांच्या सीएस आर निधीतून किरात ट्रस्ट  वेंगुर्ले, माझा वेंगुर्ला व अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांना देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहीकांचे  लोकार्पण माझी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे कोकण विभाग वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉक्टर  अमेय देसाई यांनी  रविवारी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली.

डॉक्टर अमेय देसाई यांनी रविवारी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरात ट्रस्टच्या सीमा मराठे माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष निलेश चेंनवणकर भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई , मोहन वडावडेकर , प्रशांत आपटे , राजन गावडे , कपिल पोकळे आदी उपस्थित होते 

यावेळी अमेय देसाई म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यापूर्वी कुडाळ रोटरी क्लब ला कार्डियाक ॲम्बुलन्स व्हॅन देण्यात आली आहे. आता वेंगुर्ले येथील किरात ट्रस्ट, व माझा वेंगुर्ला यांना एक व सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठान साठी एक अशा दोन रुग्ण वाहीका देण्यात आल्या आहेत . त्यांचे लोकार्पण 9 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा धिकारी के. मंजूलक्षमी उपस्थित राहणार आहेत.

या लोकार्पण कार्यक्रम पूर्वी महा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. रूपाली 3 ते 6 यावेळेत हे शिबिर घेण्यात येईल. त्याचा सुमारे 300 ते 400 लोक लाभ घेतील अशी अपेक्षा आहे. या शिबिरात उषःकाल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगलीचे तज्ञ डॉ. मोफत तपासणी करणार आहेत.यावेळी प्राथमिक औषधोपचार ही मोफत देण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया करावी लागल्यास तीही सांगली येथील रुग्णालयात मोफत केली जाणार आहे.

लोकार्पण सोहळ्यात कोरोना कालावधीत गावपातळीवर काम केलेल्या 25 डॉ. व कौन्सिलर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रचार भारती तफे् सावंतवाडी येथील लाकडी खेळणी वर एक चित्रफित बनविण्यात आली असून त्याचे प्रकाशन ही यावेळी करण्यात येणार आहे.असे देसाई यांनी सांगितले.प्रशांत आपटे यांनी प्रास्ताविक तर निलेश चेंदवणकर यांनी आभार मानले.

फोटो ,प्रदिप सावंत मेल वरुन. फोटो ओळी.पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. देसाई, सोबत राजन गावडे, बाळू देसाई, निलेश चेंदवणकर, भिमा मराठे, शरद चव्हाण, मोहन होडावडेकर, संजय पूनाळेकर व प्रशांत आपटे.

You cannot copy content of this page