बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश पाणदरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, अंकुश माजगावकर, धोंडू फणशीकर, महिला संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश पाणदरे व सुभाष मोर्ये यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा व कर्तृत्वचा वारसा आजच्या पिढीने देखील जपावा असे आवाहन केले. राकेश केसरकर यांनी आभार मानले.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करताना मान्यवर.
नट वाचनालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी
