सावंतवाडी ता.०२- : जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वेर्ले नं. १ या शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली याचे औचित्य साधून शाळेच्या भव्य पटांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. वासुदेव नाईक , विस्तार अधिकारी उपस्थित होते. वेर्ले गावचे माजी सैनिक कॅप्टन अर्जुन मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी शतक महोत्सव समितीच्यावतीने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये वेर्ले गावातील ५५ महिलांनी पाककृती सादर करून सहभाग घेतला. यामधून प्रथम क्रमांक मिनाक्षी मनोज राऊळ, द्वितीय भगीरथी साबा राऊळ, तृतीय दिपा दिपक राऊळ यांना पैठणी साडया देवून गौरविण्यात आले तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना सहभाग प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण विस्तार अधिकारी ICDC पवार मेडम यांनी केले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.वासुदेव नाईक, विस्तार अधिकारी, माजी सैनिक कॅपटन अर्जुन मर्गज शतक महोत्सव समीती अध्यक्ष श्री गणेश घाडी, उपाध्यक्ष श्री. मोहन राऊळ, सैनिक पथ संस्थेचे महाव्यवस्थापक सुनिल राऊळ, गावचे क्र. सरपंच सुभाष राऊळ, पोलीस पाटील श्री अरुण लिंगवत, मुख्याध्यापिका श्री भाग्यश्री राणे, शतक महोत्सव समिती सदस्या अस्मिता राणे, खजिनदार – नारायण नाईक, सदस्य, दिलीप राऊळ, चंद्रकांत राणे, गंगाधर राऊळ, मधुकर राऊळ , सहदेव राऊळ , रामचंद्र मर्गज, राजन राणे, साबा राऊळ, प्रवीण राऊळ, सहदेव राणे, भगवान राणे, विलास राऊळ, राजेंद्र राऊळ , शामल जाधव, महिमा राऊळ, पुंडलिक कदम, दिलीप सावंत, शाळेचे शिक्षक श्री. लोणकर, शिक्षिका अमिषा गवस तसेच पालक, ग्रामस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.bकार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची माजी विद्यार्थी व प्राथमिक शिक्षिका श्रीमन प्रज्ञा राऊळ तिने तर आभार भाग्यश्री राजे यांनी मानले.
वेर्ले नं. १ या शाळेचा शतक महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा
