अतुल काळसेकर, रणजित देसाई यांनी झेंडा दाखवत केला प्रारंभ
⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ भाजपाच्या वतीने “स्वच्छ
भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुक्याच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरावड्याच्या समारोपानिमित्त “स्वच्छ भारत व प्लास्टिक मुक्त भारत” सायकल मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. ह्या मॅरेथॉनची सुरुवात कुडाळ एसटी स्टँड नजीक सेल्फी पॉईंट – गांधी चौक येथून सकाळी ६.३० वाजता झाली. जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते खुल्या गटाला तर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते लहान गटाला झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.

यातील खुला गट २१ किलोमीटरचा होता. सेल्फी पॉईंट कुडाळ एसटी डेपो झाराप हायवेपुला खालून साळगाव सर्व्हिस रोड मार्गे भाजपा कार्यालय असा होता, तर लहान गट (१२ वर्षांपर्यंत) हा अकरा किलोमीटरचा ठरवण्यात आला होता, ज्याचा मार्ग कुडाळ सेल्फी पॉईंट, एसटी डेपो, बिबवणे हायस्कूल पुलाखालून आर एस एन चौक मार्गे कुडाळ भारतीय जनता पार्टी कार्यालय समोरील पटांगण असा होता. भाजपा कार्यालयासमोर सायकल मॅरेथॉन रॅलीचा समारोप कार्यक्रम भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माजी आमदार राजन तेली व प्रदेश सदस्य जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या उपस्थितीत झाला.

सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व सुपारी चे रोप भाजपाच्या वतीने समारंभपूर्वक देण्यात आले. कुडाळ भाजपाने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध केलेल्या कार्यक्रमाबद्दल जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी कार्यक्रम संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई आणि कुडाळ भाजपा टीमचे विशेष कौतुक केले. या मॅरेथॉन मध्ये तेर्से बांबार्डे व पिंगुळी वडगणेश मंदिर येथे विशेष स्वागत, नोंदणी व रिफ्रेशमेंट कक्ष उभारण्यात येऊन सहभागी सायकलस्वारांना सेवा देण्यात आली. समारोपाच्या ठिकाणी उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट हा सर्वांचाच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. तसेच यावेळी १३०० किमीचा कुडाळ ते कन्याकुमारी सायकल प्रवास करणाऱ्या कुडाळमधील रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडुलकर या सायकलवीरांचाही विशेष सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमास जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, रॅली-संयोजक व जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, सोशल मीडियाचे लोकसभा प्रमुख तथा प्रदेश सदस्य अविनाश पराडकर, प्रदेश सदस्य राजू राऊळ, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारीणी सदस्य आनंद शिरवलकर, तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, जेष्ठ नेते राजू राऊळ, निलेश तेंडुलकर, नगरसेवक निलेश परब, ऍड विवेक मांडकुलकर, ऍड राजीव कुडाळकर, सौ.अदिती सावंत, माजी नगरसेविका सौ. प्रज्ञा राणे, राजेश पडते, सौ.रेखा काणेकर, अजय आकेरकर, सतीश माडये, मंगेश चव्हाण, राजवीर पाटील, महेंद्र मेस्त्री, रामचंद्र परब, संतोष डिचोलकर, अजय डीचोलकर, सौ.मुक्ती परब, सौ.रेवती राणे, स्वरूप वाळके, सिद्धेश देसाई, सौ.साधना माड्ये, रोहीत आटक, प्रसन्न गंगावणे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी विवेक मुतालिक, अविनाश पाटील, मिलिंद देसाई, नचिकेत देसाई यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
ह्या सायकल मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेले,गजानन कांदळगावकर,नील कांदळगावकर,सुधाकर गाड,निलेश आळवे,कौस्तुभ कुबल,अविनाश पाटील,नचिकेत देसाई,प्रथमेश डिगसकर,अर्चना गोरे,भूषण तेजम,अविष्कार संजय खानोलकर.वेणुगोपाळ गुरुप्रसाद सवदत्ती.वेणूमाधव गुरुप्रसाद सवादत्ती.गुरुप्रसाद अनंत सवदत्ती.सचिन सातार्डेकर.कौस्तुभ कुबल.अथर्व सामंत,संस्कार संजय कदम,किसन दिपक फाटक,हेमांग प्रशांत धोंड,केदार प्रताप खांबकर,राकेश भरत साहू,अर्चना गोरे,निलेश आळवे,शमिका सचिन चिपकर,मकरंदा वायंगणकर,उमेश मोरे,चंद्रकांत बांड,विष्णू रामगडे,संजय बिडये,प्रसाद बुचडे,मिहिर गावकर,संजयकुमार कदम,दिपक शिंदे,कैलास सावंत,स्वरांगी पाटील ,स्वानंद पाटील,सौरभ ठाकूर,सांदेश सूळ,धम्मपाल जाभडे,अक्षय अंबपवार,चैतन्य सरोडे,शुभम पारकर,अन्वय मुतालिक, हरिओम तवटे,शंकर तेजम,साईश गुंड, अश्विनी तवटे,वरद माडये,सिद्धार्थ उदय शारबीद्रे,वसंत चंद्रशेखर तेली.तसेच अन्य सायकलवीर सहभागी झाले होते.
