मालवणात काँग्रेसतर्फे गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने आज मालवणात काँग्रेस पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश सदस्य ज्येष्ठ पदाधिकारी साईनाथ चव्हाण व पदाधिकारी यांच्या हस्ते गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, ऍड. अमृता मोंडकर, युवक काँग्रेस पदाधिकारी पल्लवी तारी- खानोलकर, मधुकर लुडबे, पराग माणगांवकर, सामाजिक कार्यकर्ते जुवाटकर व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page