तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी केले स्वागत
मालवण ता.०१-:
मालवण तालुक्यातील पळसंब येथे अनेक तरुण युवकांनी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.प्रवेश कर्त्यात प्रतिक जुवेकर,रुपेश जुवेकर,सौरभ परब,शेखर पुजारे,विशाल सावंत,मनिष पुजारे,अनिकेत परब आदी युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होवून आणि मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. यावेळी शाखा अध्यक्षपदी रुपेश पुजारी तर उपशाखा अध्यक्ष पदी अक्षय परब यांची निवड मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांनी केली.
यावेळी मालवण तालुका उपाध्यक्ष उदय गावडे ,मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,प्रशांत पराडकर,संकेत वाईरकर,मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदीप लाड,वैभव मालवणकर,सतीश कदम,तुषार जुवेकर आदी उपस्थित होते.
