द्वितीय मानकरी ठरले किशोर कदम
⚡वैभववाडी ता.०१ संजय शेळके-: गेली ३४ वर्ष मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या एकता कल्चरल
अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या
गणपत गुणाजी जाधव
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत
मूळचे तिथवली तालुका वैभववाडी येथील आणि सध्या सोलापूर येथे कार्यरत असलेले दिव्यांग कवी सफरअली इसफ यांनी २०२१ – २२ वर्षाचा सर्वोत्कृष्ट कवितेचा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय पारितोषिक कलमठ येथील कवी किशोर कदम यांनी प्राप्त केले असल्याची माहिती एकता
कल्चरचे अध्यक्ष प्रकाश जाधव,
उपाध्यक्ष उज्जय आंबेकर आणि सचिव प्रकाश पाटील यांनी दिली.
सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक – सफर अली इसफ – तिथवली- (देशभक्तीचे जोखड खांद्यावर घेत वंशावळ शोधतोय),दुसरा क्रमांक (विभागून) – ईशान संगमनेरकर – कांदिवली-(गोष्ट हरवलेल्या देशाची )- किशोर कदम – कलमठ- (बुजगावणी),तिसरा क्रमांक (विभागून) – सुधाकर कांबळी – कल्याण- (घोट दुःखाचे पिऊनी),सोनाली जाधव -अहिरे – कल्याण (प्रवास)
उत्तेजनार्थ पारितोषिक- जगदीश राऊत – नागपूर (आई ),शुभांगी थोटम – नवी मुंबई (मुकरुंदन),रवींद्र जाधव – लांजा – ( फक्त तुझ्यासाठी), मेघा गोळे – महाड – (आहेस कोणत्या तू गावी),संजय भोईर – पालघर (मानसिकता), शरद गाडगीळ मुंबई – (झोपडी), मायकललोपीस – वसई (बाप आमचा आम्हाला कळलाच नाही.)
स्पर्धेत महाराष्ट्रातल्या ७०कवीनी सहभाग घेतला होता.डिसेंबर दरम्यान मुंबई गिरगाव साहित्य संघात होणाऱ्या34 व्या एकता संस्कृतिक महोत्सवात विजेत्या कवींना गौरविण्यात येणार आहे.
दिव्यांग कवी सफरअली इसफ यांना नीट चालता बोलता येत नसतानाही गेली २५ वर्षे सातत्याने काव्यलेखन करत आहेत.तसेच प्रतिथयश मासिकत कविता प्रसिद्ध झाल्या असून कविसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून इसफ यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते.
कवी सफरअली इसफ यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
