मुकुंद फाटक यांनी कापली फित;
बाळ खडपे यांनी वाढविला श्रीफळ
⚡देवगड ता.०१-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भारत मातेला समर्पित पुत्राची कहाणी त्यांचा जीवन पट त्यांचे कार्य दर्शविणारे भव्य चित्र प्रदर्शन देवगड तालुका भाजपच्या वतीने टिळक स्मारक जामसंडे आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ मार्गदर्शक मुकुंद फाटक,यांच्या हस्ते फित कापून व भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून माजी आमदार ऍड अजित गोगटे,यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी,तालुका अध्यक्ष संतोष कींजवंडेकर डॉ. अमोल तेली, सरचिटणीस तथा नगरसेवक शरद ठुकरुल ,जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,प्रा.दत्तात्रय बलवान, पू.ज.ओगले,जिल्हा संयोजक प्रियांका साळसकर, शहर अध्यक्ष योगेश पाटकर,दया पाटील नगरसेविका,प्रणाली माने मनीषा
जामसंडेकर ,आद्या गुमास्ते,संजना आळवे,तन्वी शिंदे,श्वेता शिवलकर, शुभा कदम,माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर मिलिंद माने माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी, बापू जुवाटकर श्रुती जाधव,नरेश डामरी संतोष पाटकर,राजा भुजबळ , संजय बोबडी उपस्थित होते.
