मळगाव येथे शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर संपन्न
⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ- : ‘इनरव्हील क्लब’ हा सर्वसामान्य लोकांसाठी समाजात सामाजिक काम करणारा क्लब आहे. अशा या क्लबला येथील सखी भिशी ग्रुपची साथ मिळाल्यामुळे आम्ही आज महिलांसाठी शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेऊ शकलो,असे प्रतिपादन क्लबच्या सल्लागार सौ. मृणालिनी कशाळीकर यांनी केले.
सौ.कशाळीकर, सखी भिशी ग्रुप व इनरव्हील क्लबच्या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालयात महिलांसाठी शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलनाने झाले. मळगाव गावातील कित्येक महिला व युवती यांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. राखी कासरलकर यांनी केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी इनरव्हील क्लबच्या सचिव,भारती देशमुख, सोनाली खोरजवेकर, दर्शना रासम, वैभवी शेवडे,प्राची देसाई तसेच आरोग्य तपासणीसाठीच्या डॉक्टर तसेच सखी भिशी ग्रुपच्या सदस्या यांनी खूप मेहनत घेतली.
