माजी आम. प्रमोद जठार यांची ना. रवींद्र चव्हाण, ना. मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
⚡कणकवली ता. ३०-: छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे संग्रहालय विजयदुर्ग किल्ल्यावर उभारावे. त्यासाठी किल्ल्या शेजारील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असुन तेथे आरमार संग्रहालय अत्याधुनिक पद्धतीने व्हावे व राष्ट्र निर्मितीच्या या कार्यासाठी लागणाऱ्या 10 कोटी रूपयांच्या निधीची तरतुद आपल्या मंत्रालयाकडुन करावी अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व सांस्कृतिक आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा राजा भोजांनी आठशे वर्षापुर्वी बांधला . त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गे येणाऱ्या फ्रेंच , पोर्तुगीज, सिद्धी जोहर व इंग्रजांचे आक्रमण थोपवण्यासाठी सुसज्ज आरमाराचे बांधकाम याच किल्ल्याच्या परीसरातील समुद्रात सुरू केले . या आरमाराचे नेतृत्व सरखेल कान्होजी आंग्रे करीत होते . जहाज बांधणी सोबत महाराजांनी या समुद्रात संरक्षण भिंत सुद्धा बांधली . व परकीय आक्रमकांपासून महाराष्ट्राचे संरक्षण केले . आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 सप्टेंबर 2022 रोजी भारतीय नौसेनेच्या झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ” भारतीय आरमाराचे जनक ‘ असा करून त्यांच्या राजमुद्रेचा समावेश भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये केला . हा सर्व इतिहास आपल्यापुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात व्हावे ही तमाम जनतेची इच्छा आहे. अशी मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .दरम्यान या संग्रहलया संबंधीची बैठक आपल्या दालनात लावावी अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली आहे .
