⚡सावंतवाडी ता.३० सहदेव राऊळ-: पेंडूर घोडेमुख येथील गुरुवर्य कै. बुवा हरिश्चंद्र गवंडे यांच्या स्मरणार्थ नवरात्रोत्सवनिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या अंभग गायन स्पर्धेत न्हावेली येथील सुरज पार्सेकर याने प्रथम क्रंमाक पटकावला.
ही स्पर्धा नवदुर्गा सांस्कृतिक सामाजिक मंडळ, पेंडूर गोविंद गवंडे मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.
द्वितीय क्रंमाक ममता प्रभू (आजगाव ), तृतीय क्रंमाक हेमंत गोडकर (तळवडे) तर उत्तेजनार्थ विभागून प्रथम सोहम साळगावकर( आजगाव ) द्वितीय गौरी पारकर (निरवडे ) यांनी मिळविला. या स्पर्धेचे परिक्षण संगीत अलंकार सौ. विणा दळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद आडेलकर यांनी केले.
