जिल्ह्यातील उरलेली राडा संस्कृती देखील उखडून काढू…

ब्रिगेडियर सुधीर सावंत; जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली बैठक लावण्याची मागणी…

⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्ह्यातील राडा संस्कृती संपवून टाकण्यासाठी मी पालकमंत्र्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील राडा संस्कृती उकडून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सिंधुदुर्गातील राडा संस्कृती पर्यटनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यामुळे ही संस्कृती बंद झाली पाहिजे, जिल्ह्यातील राडा संस्कृती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. उरली सुरलेली राडा संस्कृती उखडून टाकु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित होऊन देखील अद्याप पर्यटन जिल्हा होण्यासाठी हवी तशी चालना मिळाली नाही आहे. बाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सुधीर सावंत यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page