⚡कणकवली ता.२८-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीच्या माध्यमातून २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त “सूत काढणारे गांधीजी” हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम विशेषतः चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे.
हा उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश मुलांना चरख्याची माहिती मिळावी, त्यांना चरखा जवळून पाहता यावा, तसेच चरखा हाताळता यावा आणि त्यासाठी प्रत्यक्ष चरखा उपलब्ध करण्यात येणार आहे.तसेच संस्थेमार्फत रांगोळी कलाकार रांगोळीच्या माध्यमातून गांधीजींचे व्यक्तिचित्र रेखाटन करतानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
सूत काढणारे गांधीजी हा उपक्रम
२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत नगरवाचनालय, कणकवली येथे होणार असून
सुलभ नियोजनासाठी प्रवेश मर्यादा फक्त १०० मुलांसाठीच आहे . ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे संदीप सावंत (9421235839) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीच्यावतीने करण्यात आले आहे.
