युवासेना तालुका कार्यकारणीची जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न…

वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी युवासेना तालुका कार्यकारणीची बैठक युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका कार्यालय वैभववाडी येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना जिल्हा कार्यकारणी सदस्य- संदीप सरवणकार, युवासेना जिल्हा चिटणीस- स्वप्नील धुरी यांनी संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने युवासेना उपतालुका प्रमुख -प्रवीण काडगे, उपविभाग संघटक (भुईबावडा पं. स.) – शुभम चव्हाण, सुमित पवार – शाखाप्रमुख तिरवडे तर्फे खारेपाटण, अभिषेक गवाणकर -शाखा प्रमुख मांगवली, सुरज झिमाळ – शाखाप्रमुख लोरे, रोमिल मोरे- शाखा प्रमुख भुईबावडा, गणेश पाटील- शाखा प्रमुख कुर्ली, सागर पाटेकर- उपशाखाप्रमुख मौदे, विक्रांत घुगरे- उपशाखाप्रमुख तिरवडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत जिल्हा समन्वयक -गीतेश कडू, जिल्हा चिटणीस -स्वप्नील धुरी, तालुका प्रमुख- मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य -संदीप सरवनकर, जिल्हा परिषद सदस्या- दिव्या पाचकूडे, युवासेना तालुका प्रमुख -अतुल सरवटे, विभाग प्रमुख -आकाश गुरव, गणेश पवार, रोहित पावसकर, वाहतूक सेना तालुका प्रमुख -बबन धुरी, जितेंद्र तळेकर, रोहन रावराणे, राजेश पवार, निखिल मोरे, रोहित रावराणे यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page