⚡कणकवली ता.२५-: कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसऱ्या इयत्तेत शिकणारी सात वर्षीय विद्यार्थिनी स्वरा संतोष घाडीगांवकर हिला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. तिच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , सिंधुदुर्ग विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन तिच्या प्रकृती विषयी चौकशी केली . तसेच सिंधुदुर्ग विभागाच्या आपत्कालीन निधीमधून स्वराच्या उपचारासाठी मदत देण्यात आली .
यावेळी घाडीगांवकर समाजाचे पदाधिकारी सर्वश्री विजय गावकर , सूर्यकांत घाडी , प्रदीप घाडी , विलास गांवकर ,लक्ष्मण घाडीगावकर , बुधाजी गावकर , उमेश घाडीगावकर , अशोक घाडीगांवकर , स्वराचे आईवडील संतोष घाडीगावकर आणि संजना घाडीगांवकर , स्वराच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा सावंत आणि शिक्षिका वैष्णवी परब उपस्थित होते.
