सावंतवाडी शहरातील समस्यांबाबत नवीन पालकमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधणार…

पुंडलिक दळवी; मुंबईचे पालकत्व मिळालेल्या केसरकर यांनी आत्मपरीक्षण करावे

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरची कमतरता असून, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तेथे गेलेल्या रुग्णांना दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. याबाबत आपण जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असून, याबत त्यांना निवेदन देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांना स्वतःचा जिल्हा सोडून शिंदे फडणवीस सरकारने मुंबई आणि कोल्हापूर मध्ये प्रमोशन दिले असून, त्यांना आता आत्मपरीक्षणाची गरज आहे? असा टोला देखील दळवी यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page