⚡मालवण ता.२३-: राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा सप्ताहाच्या अनुषंगाने समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा येथे समतादूतांमार्फत तृतीय पंथीय व्यक्तींचे सर्वेक्षण व नोंदणीसाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत बार्टीचे सिंधुदुर्ग प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत सगुण जाधव, सुदिप कांबळे, सुजित जाधव, सुहास मोचेमाडकर, श्यामल सावंत, राजू दिनदयाळ, एस. एस. कासले आदिंनी सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, मालवण, दोडामार्ग, देवगड, वैभववाडी, कुडाळ बसस्थानक, बाजारपेठा येथे तृतीय पंथीय व्यक्तींच्या नोंदणीसाठी जनजागृती कार्यक्रम राबविला. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समतादूतांमार्फत तृतीय पंथीयांचे सर्व्हेक्षण
