कुंभारमाठ येथे २६ रोजी बसप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

⚡मालवण ता.२३-: महाराष्ट्र प्रदेश बहुजन समाज पक्षाने ‘होऊ शकत आहे’ हा विषय घेऊन ‘शासनकर्ते बनो अभियानांतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कुंभारमाठ येथील जानकी हॉटेल सभागृह येथे आयोजित केले आहे.

प्रशिक्षण शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बसपचे राष्ट्रीय महासचिव तथा राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र मुख्य प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंह, प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष अॅड. संदीप ताजने, राज्य प्रभारी प्रा. प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव राजेंद्र आयरे आदी मार्गदर्शन करणार आहेत. बसपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर व महासचिव आनंद धामापूरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page