⚡मालवण ता.२३-: मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे पर्यटन सप्ताहांतर्गत मराठी विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार व सांस्कृतिक विभाग आयोजित जिल्हास्तरीय खुली पोस्टर स्पर्धा २८ रोजी होणार आहे. स्पर्धा सकाळी ९ . ते ११ या वेळेत ‘जबाबदार पर्यटन’ या विषयावर घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. के. के. राबते (८३८१०२२५२९), प्रा. एच. एम. चौगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धा
