आनंदव्हाळ – कातवड येथील नवदुर्गा मंदिरात नवरात्रोत्सव

⚡मालवण ता.२३-: आनंदव्हाळ- कातवड जोईवाडी येथील श्री देवी नवदुर्गा मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. घटस्थापना होणार आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात सायंकाळी पोथीवाचन, आरती, भजन, गरबा आदी कार्यक्रम होणार आहेत. तर दि. ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्यादिवशी सकाळी ९ वाजता होमहवन होणार आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन नवदुर्गा व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page