तळवडे येथे नवरात्रोत्सवानिमित्त २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡बांदा ता.२३-: प्रकाश परब मित्रमंडळ, देवस्थान व्यवस्थापन कमिटी, समस्त गांवकर आणि तळवडे ग्रामस्थ आयोजित २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर रोजी श्री देवी सातेरी मंदिर, तळवडे येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार २६ रोजी सायंकाळी ७ वाजता कीर्तन महोत्सव रात्री ८ वाजता भजन महोत्सव, मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता किर्तन महोत्सव, रात्री ८ वाजता भजन महोत्सव, बुधवार २८ रोजी सायंकाळी ७ वाजता किर्तन महोत्सव रात्री ८ वाजता तळवडे गावातील मुलांचे व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवारी २९ रोजी सायंकाळी ७ वाजता किर्तन महोत्सव रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ यांचा कृर्मदासाची वारी हा नाट्यप्रयोग, शुक्रवारी ३० रोजी सायंकाळी ७. वाजता किर्तन महोत्सव रात्री ८. वाजता दांडिया व फुगडी महोत्सव व सामुहिक दांडिया नृत्य, फनी गेम्स,शनिवार १ रोजी सायंकाळी ७. वाजता किर्तन महोत्सव रात्री ८. वाजता दांडिया व फुगडी सामुहिक दांडिया नृत्य व फनी गेम्स, रविवारी २ रोजी सायंकाळी ७. वाजता किर्तन महोत्सव रात्री ८ . वाजता दांडिया व फुगडी सामुहिक दांडिया नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान महिला व प्रेक्षकांसाठी फनी गेम्स व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page