न्हावेली येथे नवरात्रोत्सवानिमित्त ३० सप्टेंबर रोजी अभंग गायन स्पर्धा

⚡बांदा ता.२३-: श्री देवी माऊली मित्रमंडळ व न्हावेली ग्रामस्थ,आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त ३० सप्टेंबर रोजी न्हावेली माऊली मंदिरात सायंकाळी ६ वाजता खुला गट व लहान गटामध्ये अंभग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.


खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक १५०० व चषक, द्वितीय १००० रुपये व चषक, तृतीय ७०० व चषक, उत्तेजनार्थ ५०० व चषक, उत्तेजनार्थ २०० व चषक तसेच लहान गटामध्ये प्रथम पारितोषिक १००० रुपये व चषक, द्वितीय ७०० व चषक, तृतीय ५५० व चषक, उत्तेजनार्थ २५० व चषक, उत्तेजनार्थ २०० व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे उदय परब ८२७५४०८८७९ व सुरज पार्सेकर यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page