बांदा/प्रतिनिधी
बांदा-पत्रादेवी रस्त्यालगत देऊळवाडी येथे भर वस्तीत असलेले भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख अण्णा पाटकर यांची घराच्या अंगणातील दुचाकी चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्याकडून झाला. मात्र लॉक न उघडल्याने चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यानी रागाच्या भरात गाडीची सीट फाडून वायरिंग कापून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना रात्रीची घडली. आज सकाळी पाटकर यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांना देखील धक्का बसला. दुचाकीच्या सिटचा अक्षरशः चेंदाचेंदा करण्यात आला. तसेच गाडीचे वायरिंग देखील कापून टाकण्यात आले. पाटकर यांनी दोन दिवसांपूर्वीच गाडीची लॉक सिस्टीम बदलली होती. त्यामुळे लॉक न उघडल्याने चोरीचा प्रयत्न फसला. वयक्तिक रागातूनही अज्ञातकडून हा प्रकार घडण्याची शक्यता देखील पाटकर यांनी व्यक्त केली आहे.
भाजप शक्ती केंद्र प्रमुखांची दुचाकी चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न
