सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळातर्फे आयोजन : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण
⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळातर्फे आयोजित केलेल्या सुनिता तारी स्मृती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. पणदूर हायस्कुल च्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या खुल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त नीता सावंत (कुणकेरी शाळा ), द्वितीय तृप्ती गावडे (फणसगाव हायस्कुल) वैभव खानोलकर (उभादांडा हायस्कुल ), तृतीय सुषमा प्रवीण मांजरेकर (आरोस विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस ) यांना शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी डॉ मुश्ताक शेख, हिंदी मंडळाचे अध्यक्ष कैलास जाधव, गोवा हिंदी कला अकादमीचे अध्यक्ष सुनील शेट, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघांचे अध्यक्ष वामन तर्फे, शिक्षक संघटनेचे नेते संजय वेतोरकर, पणदूर हायस्कुल चे माजी मुख्याध्यापक सुधाकर वळंजू, सचिव सुमंत दळवी, उपाध्यक्ष दीपक तारी आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले अपल्या देशात सर्वाधिक अधिक हिंदी भाषा बोलली जाते हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे राष्ट्रभाषेच्या प्रसारासाठीचे हिंदी मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले
