युवा कार्यकर्ते अजय सावंत यांचे सौजन्य;युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते वाटप
⚡सावंतवाडी ता.२१-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम तथा अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात भाजप कडून सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त युवा कार्यकर्ते अजय सावंत यांच्या सहकार्यातून माजगाव शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले.
यावेळी ,प. स.सदस्य बाबु सावंत,ग्राम. स. बाळा वेजरे,माजी सरपंच मंगेश राठवड , साळगांवकर, आकेरकर ,फर्नांडीस मॅडम व शिक्षक वर्ग व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
