नगर वाचनमध्ये भाजप युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते शुभारंभ
⚡वेंगुर्ल ता.२१-: भारत मातेचे समर्पित सुपुत्र जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन वेंगुर्ले येथील नगरवाचनालय हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचा शुभारंभ भाजपाचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले
राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे .
यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे .
