निबंध स्पर्धेत आरपीडीचा. योगेश जोशी तालुक्यात प्रथम

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ -:: पंचायत समिती सावंतवाडीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत कु. योगेश विवेकानंद जोशी याने तालुक्यात प्रथम क्रमांक तर वक्तृत्व स्पर्धेत कु. अस्मी प्रविण मांजरेकर हिने तालुक्यात द्वितीय कमांक पटकाविला.

या उत्कृष्ट यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकास सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री . सी. एल. नाईक शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड , उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगांवकर यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page