⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील उर्दू शाळेत पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पथनाट्याव्दारे जनजागृती केली आहे.यात बाहेर पदार्थ खाल्ल्याने काय परिणाम होतात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्या, फळे,दुध,अंडी आहारात समावेश असावा अशा प्रकारे जनजागृती केली आहे.
तसेच प्रत्येक विद्यार्थी पालक यांच्या वतीने पोषण आहार सप्ताह निमित्त विविध पदार्थ बनवून प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, तसेच नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय अडसूळ यांनी ही रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कशाची गरज आहे याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय अडसूळ,अहमद बटवाले, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे, सदस्य फिरोज साठविलकर, ऋषिकेश मोरजकर, मुख्याध्यापक अ.रज्जाक अ.लतीफ मुंगी, हवालदार,शकील बटवाले,गफुर बटवाले, बटवाले, तसेच शिक्षक अ. रज्जाक अ. लतीफ मुंगी शेख, सारा जमीर अहमद,कित्तूर मुश्ताक अहमद यासीन शेख, मो. आसिफ इक्बाल आदी पालक वर्ग उपस्थित होते.
नांदगाव उर्दू शाळेत पोषण आहार सप्ताह साजरा
