भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी ता.२०-:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, चराठा येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये दप्तर वाटप कार्यक्रम तसेच खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे युवानेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
