तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आरपीडीचे यश

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: सावंतवाडी पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजतर्फे यश मिळविले.

देशातील तंत्रज्ञानामध्ये नविन उपक्रमांची भर व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती व्हावी या हेतूने पंचायत समिती सावंतवाडी यांचेकडून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२१-२२ चे आयोजन सेंट्रल इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज तर्फे चलप्रतिकृतीमध्ये प्राथमिक स्तरातून पर्यावरण संवर्धन प्रतिकृती म्हणून वायूप्रदूषण व जलप्रदूषण नियंत्रक प्रकल्प सादर केला होता. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवृंद या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकास सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री . सी. एल. नाईक शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड , उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगांवकर यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page