केसरकरांच्या मांडीला मांडी लावून संजू परब बसले

आता केसरकरांचे धंदे बाहेर कोण काढणार ? ;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा प्रश्न

⚡सावंतवाडी ता.१९-: आमदार दीपक केसरकर यांचे धंदे बाहेर काढणारे माजी नगराध्यक्ष संजू परब हे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असल्याने त्यांचे धंदे आता कोण बाहेर काढणार नाहीत. असा जोरदार टोला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, कोरोना काळात आपल्या मतदार संघाला वाऱ्यावर सोडून मुंबईत लपून बसणारे आमदार केसरकर यांना मंत्रालयात कोण येत की नाही हे कसे दिसणार असा सवाल उपस्थित करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर बोलण्याचा आमदार दीपक केसरकर यांना नैतिक अधिकार नाही. असा इशारा दिला.

यावेळी ते पुढे म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या चष्मा कारखाना, आडाळी एम आय डी सी तसेच इतर उद्योगांचे काय झाले, आमदार होऊन 7 -8 वर्ष झाली या अवधीत किती उद्योग आणले. हे जाहीर करावे. तसेच सावंतवाडी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी मध्ये शिकून किती विद्यार्थी पुढे गेले हे जाहीर करावे असे आवाहन देखील त्यांनी दिले आहे.

तालुक्यातील काही गावात मायनिंग प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत असून, दीपक केसरकर हे स्वार्थी राजकारणी आहेत. जेथे स्वार्थ असेल तेथे ते दिसतात. त्यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर करत असून, शिवधनुष्य या चिन्हावर दावा सांगणारे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या बॅनर वरून चिन्ह गायब करत शिवसेनेसह त्याच्या चिन्हावर आपला काहीच अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या बॅनर वरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील काढला जाईल असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

You cannot copy content of this page