*💫बांदा दि.३०-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सदोदित तत्पर असलेल्या न्हावेली ग्रामपंचायतने नागरिकांसाठी निसर्गोपचार चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन स्वतःच्या आरोग्यासह गावाचे आरोग्य तपासून शिबिर यशस्वी केले. न्हावेली जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नं.1 मध्ये आयोजित जीवनरक्षा हॉस्पिटल यांच्या सौजन्याने तसेच न्हावेली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शरद धाऊसकर, उपसरपंच विठोबा गावडे, ग्रा.पं.सदस्य जयश्री नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गावडे, मुख्याध्यापक स्मीता नाईक, ग्रामस्थ राजन कालवणकर, मनोहर धाऊसकर, जयवंत नाईक, सीताराम गावडे, अक्षता दशवी, अश्वीन धवन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
न्हावेलीत निसर्गोपचार चिकित्सा शिबिरास प्रतिसाद….
