सावंतवाडीत भाजप तर्फे सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मत्स्य महोत्सवाचे आयोजन

*५ ते ७ फेब्रुवारीला आयोजन; अतुल काळसेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती*

*💫सावंतवाडी दि.३०-:* जिल्हामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य शेती सुरू असून, सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी येथील भोसले उद्यानामध्ये ५ ते ७ फेब्रुवारी रोजी मत्स्य महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती अतुल काळसेकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच या महोत्सवात गोड्या पाण्यातील माशांचे वेगवेगळे खाद्य पदार्थांची चव चाखण्यासाठी मिळणार आहे. हा महोत्सव संध्याकाळी ५ ते १० या वेळेत तीन दिवस भरणार असून, सकाळच्या सत्रात गोड्या पाण्यातील माशांचे खाद्य पदार्थ कसे करावेत या बाबत मार्गदर्शन तसेच ट्रेनिंग देण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, रविकिरण तोरस्कर, बंड्या सावंत,भाजप महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page