स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या कोकण प्रदेशाध्यक्ष पदी प्रा. रुपेश पाटील

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी किरण बागुल

⚡सावंतवाडी ता.१५- : नुकतीच स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण आण्णा नेरकर यांचे प्रमुख उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी अनेक महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा होऊन आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी किरण संभाजी बागुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोकण प्रदेश अध्यक्ष पदी प्रा. रुपेश पाटील यांची तसेच मुख्य प्रदेश संघटक म्हणून राहुल वाघ व कायदेशीर सल्लागार पदी अॅड. संतोष जाधव यांची निवड करण्यात आली.
मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी रतनलाल सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्रीकांत दारोळे व पूर्वी नेमणूक करण्यात आलेले पदाधिकारी त्याच पदावर कार्यरत असतील, असे ठरविण्यात आले. यावेळी चंद्रगुप्त खैरनार, प्रकाश बाविस्कर, विनायक अहिरे, देवानंद जगताप, लक्ष्मीकांत बेडसे, देवेंद्र पाटील, कैलास गर्दे, मुरलीधर खलाणे, देवेंद्र बनसोडे, दिनेश निकुंभ, नरेश गवळे, विजय मरसाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, राजू तावडे, युवराज पाटील, हेमंत जगदाळे, प्रकाश लोहार, सुनील विभांडीक, बंडूनाना गांगुर्डे, पंकज खरे, डॉ. रवींद्र डांगचे, व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश बाविस्कर तर आभार राज्य प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेश कढरे, रितेश चित्ते, पंकज अहिरे, बबलू नवगिरे, राकेश निकम, दीपक पाटील, विजय तिजविज आदींनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page