दुचाकीतून दारू विक्री करणा-या एकाला सालईवाडा येथून ताब्यात

सावंतवाडी पोलिसांची कारवाई

⚡सावंतवाडी,ता.१३-: सावंतवाडी पोलिसांनी दुचाकीतून दारू विक्री करणा-या एकाला सालईवाडा येथून ताब्यात घेत त्याच्याकडून आठ हजाराच्या दारूसह ज्युपिटर कंपनीची दुचाकी, असा ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे
ही कारवाई सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांच्या पथकाकडून करण्यात आली. श्रीकांत चंद्रकांत आजगावकर (५३) असे संशयिताचे नाव आहे. .
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील काही भागात दुचाकीचा आसरा घेवून काही तरुण बेकायदा गोवा बनावटीची दारू विकत असल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरात गस्त घालणाऱ्या पोलिस अधिकारी श्री. कराडकर व त्यांच्या सहकाऱ्यांना सालईवाडा भागात श्रीकांत हा संशयास्पदरित्या दिसून आला. यावेळी त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत वेगवेगळ्या कंपनीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. या प्रकरणी त्याला गाडी व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते करीत आहेत.

You cannot copy content of this page