मालवण दि प्रतिनिधी
प्रादेशिक विज्ञान प्राधिकरणच्या राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था यांच्या तर्फे मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग, वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय व वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा येथे वराडकर हायस्कुल मध्ये आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सगळं ओकेमदी या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला. या नाटकाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
कट्टा येथील वराडकर हायस्कूल मध्ये आज विज्ञान मेळावा आणि विज्ञान नाट्योत्सवात पार पडला. या विज्ञान नाट्योत्सवाचे उदघाटन गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी उदय दिक्षित, जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस, कट्टा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आनंद वराडकर, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, सेक्रेटरी विजयश्री देसाई, सुनील नाईक, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक, इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक हृषीकेश नाईक, वराड हायस्कूलचे मुख्याध्यापक पि. के पाटिल व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आज दिवसभरात विज्ञान नाट्योत्सवात, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती, निबंध स्पर्धा या पार पडल्या. यातील नाट्योत्सवाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात भंडारी ए. सो. हायस्कुलने कोरोना महामारी आणि त्याचे सामाजिक जीवन व तंत्रज्ञानावर झालेले परिणाम या विषयावर आधारित सगळं ओकेमदी हे नाटक सादर केले. या नाटकाचे लेखन ऋषी श्रीकांत देसाई यांनी तर दिग्दर्शन प्रफुल्ल देसाई यांनी केले. तर नाटक निर्मितीस मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे, आर. डी. बनसोडे यांचे सहाय्य लाभले. या नाटकात भावेश वराडकर, विश्वदीप बनसोडे, स्मित गोसावी, हर्षल सांडव, यश नाईक, सर्वेश करंगुटकर, वेदांत वायंगणकर, सम्राट राजे या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाची नेपथ्याची बाजू सदाचुरी, कुशल अंधारी, प्रथमेश चव्हाण यांनी तर संगीताची बाजू शेखर भगत यांनी सांभाळली. या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवीला. याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने, वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, हृषीकेश नाईक, भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनरारी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
