⚡देवगड ता.१३-: देवरुख येथील महेश एजन्सी चे मालक, प्रथित यश व्यापारी श्री नागेश उर्फ मनोज बुर्शे यांची कन्या ,कुमारी रिया बुर्शे हीने (आर्किटेक्चर) वास्तुशास्त्र या विषयात विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली आहे.
कुमारी रिया हिचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख येथे, इयत्ता अकरावी बारावीचे शिक्षण संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे व आर्किटेक्चर ची पदवी डी. वाय. पाटील कोल्हापूर इंजीनियरिंग महाविद्यालयात पूर्ण केली आहे .विशेष प्राविण्यासह कुमारी रिया हिने पदवी प्राप्त केली असल्यामुळे साडवली, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी या विभागात तिचं कौतुक केलं जात आहे. तिची पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायची इच्छा आहे .आणि त्या दृष्टीने ती आता प्रयत्न करत आहे. तिच्या भावी शिक्षणासाठी, भावी आयुष्यासाठी ए एम टी ग्रुप साडवली, जैनोन्नती मंडळ साडवली, दिगंबर जैन कासार समाज संस्था शाखा रत्नागिरी यांचे कडून तिला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे. रिया आणि तिच्या आई-वडिलांचं तिला भावी शिक्षणासाठी प्रोत्साहन आहे.कुमारी रिया व सर्व बुर्शे कुटुंबीयाचं अभिनंदन करण्यात येत आहे.
