Headlines

एन एन एम एस परीक्षेत मधुरा मांगले हिला शिष्यवृत्ती

⚡देवगड ता.१३-: साडवली येथील मांगले ट्रान्सपोर्ट चे मालक मंदार मांगले यांची मुलगी कुमारी मधुरा मंदार मांगले ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला(NNMS) बसून त्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेली आहे. त्यामुळे तिला सदरची शिष्यवृत्ती मिळाली असून इयत्ता बारावी पर्यंत तिला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या तिच्या शिष्यवृत्ती मुळे ती स्वतःच स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवू शकेल अशा तऱ्हेने ही स्कॉलरशिप तिने मिळवलेली आहे. यापूर्वीही ती पूर्वीच्या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांना ती पास झालेली आहे आणि तिला ती ही शिष्यवृत्ती मिळालेली आहे.

तिने या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम प्रकारे यश मिळवल्यामुळे ए एम टी ग्रुप साडवली ,जैनोन्नती मंडळ साडवली, दिगंबर जैन कासार समाज संस्था शाखा रत्नागिरी यांच्यातर्फे तिला पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच तिचे, तिच्या आई-वडिलांचे आणि आजी आजोबांचे व गुरुजनांचे याप्रसंगी अभिनंदनही करण्यात आले.

You cannot copy content of this page