धामापूर येथील रंजना गावडे यांचा मृतदेह मिळाला कर्ली खाडीत

८ सप्टेंबर रोजी मिळाला होता बेवारस मृतदेह;मालवण पोलिसांना ओळख पटविण्यात यश

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली खाडीच्या पात्रात दि. ८ सप्टेंबर रोजी आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात मालवण पोलिसांना यश आले असून तो मृतदेह धामापूर येथील सौ. रंजना दत्ताराम गावडे (वय ७०) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली खाडी पात्रात गुरुवारी ८ रोजी रात्री एका अनोळखी महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना सापडून आला होता. याबाबत मालवण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मृतदेहाचा पंचनामा केला तसेच मालवण ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र मृतदेहाची ओळख पटली नव्हती. याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह धामापूर येथील सौ. रंजना दत्ताराम गावडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सौ. गावडे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला की यामागे कोणता घातपात आहे का याबाबत पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे हे अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page