…अन्यथा जशाचं तसे उत्तर देणार

अशोक दळवी यांच्या इशारा; मंत्री उदय सामंत यांच्या बाबतीतील वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध…

⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यावेळी अप्पा जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांच्या बाबत केलेले वक्तव्य निषेधार्थ असून, सिंधुदुर्गातील शिंदे गटाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला आहे.

यावेळी यापुढे असे वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा पंचायत समिती माजी सभापती अशोक दळवी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page