⚡कणकवली ता.१२-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून आर्ट वर्ल्ड क्लास, टेबवाडी कणकवली येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , विद्यामंदिर हायस्कूलचे कलाशिक्षक प्रसाद राणे , व्ही. व्ही. सावंत, कलाशिक्षक शंकर राणे, केदार टेमकर , स्वयंदीप ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत, सेक्रेटरी संतोष सावंत, ॲड .मनीषा सावंत,ॲड .अग्निवेश तावडे,कु.तनिष्का सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते
कार्य शाळेविषयी माहिती देताना संदीप सावंत म्हणाले,28, 29, 31 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर यावेळी होणाऱ्या चित्रकला परीक्षेविषयी मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळावे व त्यांना परीक्षा देत असताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे व कश्या प्रकारे पेपर सोडवला पाहिजे याची माहिती मिळावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या पुढेही संस्था अशा प्रकारचे मुलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले ,संस्थेने हे मुलांसाठी केलेले कार्य खूप प्रशंसनीय आहे आणि अशा प्रकारची कार्यशाळा होणे हे मुलांच्यादृष्टीने महत्वाचे आहे. संस्थेच्या पुढील कामाकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रसाद राणे यांनी स्थिरचित्र, स्मरणचित्र, डिझाईन, अक्षर लेखन व भूमिती या सारख्या विषयांची माहिती मुलांना चांगल्या प्रकारे दिली. परीक्षे मध्ये पेपर सोडवताना कशाप्रकारे सोडवावा, त्यातील बारकावे कसे पहावेत, निरीक्षण करणे याविषयी सखोल माहिती दिली. तसेच पेपर सोडवताना कोण कोणती काळजी घेतली पाहिजे, वेळचा वापर कसा केला पाहिजे याची उत्तम माहिती मुलांना दिली. आपल्याजवळ असलेल्या साहित्याचा वापर कमी वेळात कशा प्रकारे करू शकतो हेही सांगितले. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन केले आणि परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
कलाशिक्षक शंकर राणे व केदार यांनी मुलांना स्थिरचित्र,स्मरणचित्र व डिझाईन यांची प्रात्यक्षिक मुलांना दाखवली व माहिती दिली.
ऋतुजा शिरवलकर,रत्नेश जातेकर व जुही टोनेमारे या मुलांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
पालकांनीही अशा प्रकारची कार्यशाळा होणे हे गरजेचे होते व आपण आमच्या मुलांना चित्रकला या कार्यशाळेचे आयोजन करून एक चांगली संधी निर्माण करून दिल्याबद्दल त्यांनीही संस्थेला धन्यवाद दिले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी अग्निवेश तावडे उपस्थित होते. ते मुलांनी काढलेली चित्रे पाहून भारावून गेले. त्यांनी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचेही कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तनिष्का सावंत हिने केले व प्रस्तावना संदीप सावंत यांनी केली. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सेक्रेटरी संतोष सावंत यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन मनिषा सावंत व शंकर राणे यांनी केले होते.
स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली मार्फत चित्रकला परीक्षा कार्यशाळा
