⚡वेंगुर्ला ता.१३-: होडावडा आरोग्य उफद्राला कै. मनोहर गंगाराम धावडे यांच्या स्मरणार्थ मुंबई (होडावडा) येथील अभिजीत धावडे यांच्यातर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते रविद्र केळूसकर यांच्या प्रयत्नातून रूग्णांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय साहित्य माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रसिका केळूस्कर यांच्या हस्ते देण्यात आले. हे सर्व साहित्य आरोग्य सेविका व्ही. व्ही. आरोलकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी श्रीकृष्ण कोंडुस्कर, समीर सावंत, राजू पेडणेकर, रविंद्र केळूसकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कविता जाधव, आशा स्वयंसेविका मृदुला जाधव, सुवर्णा टोपले, अक्षता साळगांवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक मसुरकर यांनी केले व सर्वांचे आभार मानले.
